भरपूर बातम्या... अरे बापरे! पूर्वार्ध

Protected Area Update या द्वैमासिकासाठी मी संपादकीय साहाय्य करते. भारतीय उपखंडातील, विशेषतः भारतातील संरक्षित वनक्षेत्र अर्थात राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये यांतील घडामोडींविषयक बातम्यांचे संकलन असे या द्वैमासिकाचे रूप आहे. २४ पानांचे हे बातमीपत्र वर्षातून सहा वेळा प्रकाशित होते. 

Protected Area Update चा नवा अंक जून महिन्याच्या सुरुवातीला प्रकाशित होईल. या अंकाचे काम करताना लक्षात आले की गेल्या एखाद-दोन अंकांत महाराष्ट्रातील संरक्षित वनक्षेत्रांतील बातम्यांची संख्या इतर बातम्यांच्या तुलनेत जास्त आहे.

काही वर्षांपूर्वी माझी एक सहकारी पत्रकार मला म्हणाली होती, "Maharashtra is a hot bed of stories!" ते आठवले. तेव्हा मला "हे 
काहीतरी चुकीचं वाटतंय गड्या!" असे वाटले होते; या वेळी पुन्हा एकदा तसेच वाटले.

भरपूर बातम्या म्हणजे भरपूर घडामोडी... आणि घडामोडी म्हणजे काहीतरी बदल... त्या पुढे जाऊन, बातमी देण्याजोग्या घडामोडी म्हणजे एकदम काहीतरी मोठी कौतुकास्पद वाटावी अशी घटना; जसे, आंतरराष्ट्रीय मानसन्मान, पुरस्कार वगैरे किंवा मग, वन्यजीव संरक्षणविषयक परिषदा, करार...  नाहीतर मग, एकदम दुसरे टोक; वन्यजीवांना नजीकच्या भविष्यात असलेल्या धोक्याची नांदी देणारे बदल किंवा
धोरण-बदल; दुर्घटना वा कायदेभंगातून झालेला, होऊ घातलेला ऱ्हास. 

त्यातही बहुतेक वेळा दुसरेच टोक.

तेव्हा, वन्यजीवविषयक बातम्यांच्या प्रकाशानाशी संबंध असला; तरीही 'भरपूर बातम्या' म्हटलं की माझी पहिली प्रतिक्रिया "अरे बापरे!" अशी होते
.

Comments