Posts

Showing posts from July, 2015

निसर्ग आणि पर्यटन (भाग २)

Image
गेल्या खेपेस आपण अविचारी पर्यटनामुळे निसर्गावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत वाचले. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी जबाबदार पर्यटनाचे काही प्राथमिक निकष समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यापैकी काहीजण विविध प्रसंगी पर्यटक आणि यजमान अशा दोन्ही भूमिका बजावीत असतील; तर बाकी सगळे पर्यटकाच्या भूमिकेत अधूनमधून निश्चितच शिरत असतील, तेव्हा, या निकषांवर आपण कुठे आहोत, हे आपल्यापुरते तपासून पाहण्यास सुज्ञ वाचकांची हरकत नसावी! निसर्ग-केंद्रित पर्यटन निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक येतात त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटन व्यवसाय आपसूकच वाढू लागतो. मात्र, पर्यटन व्यवसाय वाढतो म्हणजे प्रामुख्याने पर्यटकांसाठी राहण्या-जेवण्याच्या पर्यायांमध्ये वाढ होते. जबाबदार पर्यटनात केवळ ही वाढ अपेक्षित नाही; तर पर्यटन निसर्गाभोवती विकसित झालेले असणे अपेक्षित आहे.  पर्यटनस्थळाची नैसर्गिक बलस्थाने जसे भौगोलिक वैशिष्ट्य, जैविक विविधता व त्यावर आधारून रुळलेली पारंपरिक जीवनशैली, सांस्कृतिक वैशिष्ट्ये केंद्रस्थानी ठेवणारे पर्यटन हवे. उदाहरणार्थ – वाघाच्या जंगलात जाणारा पर्यटक फक्त वाघ बघून परत येतो. वाघाचे जंगल कसे आहे, त्यात कोणत्या वनस

निसर्ग आणि पर्यटन (भाग १)

Image
शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या सुरु होऊ लागल्यामुळे घरोघरी भटकंतीचे बेत सुरू झाले असतील. दूरवरील भ्रमंतीसाठी तिकिटे, राहण्याजेवण्याच्या सोयी बघून-ठरवून झाल्या असतील, त्याचबरोबर छोट्या कार्यक्रमासाठी, दोन दिवसांच्या सुटीपुरते जाण्यासाठी जवळपासच्या ठिकाणांची चाचपणी सुरू झाली असेल. अशा वेळी मुंबईजवळील ठिकाणांचा व पर्यायाने रायगड जिल्ह्याचा विचार केला जातो. रायगड जिल्ह्यात उन्हाळी-दिवाळी-हिवाळी सुट्यांच्या काळात पर्यटकांची गर्दी असते; तशी ती वर्षभरातील दर शनिवार-रविवारीही असते. जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची स्थळे आहेत; तो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणांपासून जवळ आहे; रस्ते, रेल्वेमार्ग आणि जलमार्गाने जोडलेला आहे यामुळे पर्यटकांना इथे पोहोचणे सोयीचे ठरते, इथे राहण्या-जेवण्याचे घरगुतीपासून ते तारांकितपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत वगैरे कारणे पर्यटकांची गर्दी होण्याला आहेत. मात्र, या दुय्यम बाबी झाल्या. मुळात रायगड जिल्हा निसर्गरम्य आहे म्हणून पर्यटक इकडे आकर्षित होतो! भौगालिकदृष्ट्या लहानशा, चिंचोळ्या कोकणकिनारपट्टीचा भाग असलेल्या रायगड ज